About Marathi Department

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागाची स्थापना १९७२ या वर्षी झाली. या विभागाची उज्ज्वल अशी एक परंपरा आहे. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रभाकर पाटील, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एकनाथ घाग, आदिवासी नाटकाचे अभ्यासक डॉ. रमेश कुबल, सुप्रसिद्ध कवी नाटककार प्रा. सिद्धार्थ तांबे इत्यादी प्राध्यापकांनी हा विभाग आपल्या संशोधन आणि अध्यापनाने समृद्ध केला आहे.

या विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्र, साहित्यक्षेत्र, नाट्यक्षेत्र, नृत्यक्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली नाममुद्रा उमटवली आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष कला शाखेत मराठी विषय अभ्यासण्याची सोय असून या विभागामध्ये सहा विषय घेऊन मराठीमध्ये बीएची पदवी संपादन करता येते.

Syllabus

प्रथम वर्ष कला (अनिवार्य मराठी)

Syllabus : Click Here To View Syllabus

प्रथम वर्ष कला (ऐच्छिकमराठी/अभ्यास पत्रिका क्रमांक १)

Syllabus : Click Here To View Syllabus

द्वितीय वर्ष कला (अभ्यास पत्रिका क्रमांक २ आणि ३)

Syllabus : Click Here To View Syllabus

तृतीय वर्ष कला (अभ्यास पत्रिका क्रमांक४/५/६/७/८/९)

Syllabus : Click Here To View Syllabus

Achievements

Staff

१. डॉ. शत्रुघ्न फड (सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख)(एम. ए., बी. एड, नेट, एम. फिल, पी.एचडी)- ७ जानेवारी२००२ पासून अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालयात कार्यरतलेखन-संशोधन:‘महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे अभ्यासक’ या विषयावर एम.फिल.साठी प्रबंधलेखन:मराठी ओवी गीतांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास या विषयावर पीएच.डी.साठी प्रबंधलेखन
:विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत ‘ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासींच्या लोकप्रयोज्य कला: एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर बृहतसंशोधन प्रकल्प पूर्ण.:महाराष्ट्र सरकार च्या लोकसाहित्य संशोधन मंडळावर सदस्य:‘परिवर्तन’ या अनियतकालिकाचा काही काळ संपादक:‘वर्तकाईट’ या महाविद्यालयीन वार्षिकांकासाठी संपादन सहाय्य:‘आदिवासी साहित्य आणि लोककला’ या ग्रंथाचे संपादन:विविध नियतकालिकांमधून शोधनिबंध प्रसिद्ध

संशोधन मार्गदर्शक: मुंबई विद्यापीठ,मराठी विषयाचा संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता.

पदव्युत्तर शिक्षक: मुंबई विद्यापीठ, मराठी विषयासाठी पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता.

अभ्यागत व्याख्याता: लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ येथे लोकसाहित्य या विषयाचे अध्यापन.

विविध कार्यक्रमात सहभाग: विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरां मध्ये व्याख्याता म्हणून उपस्थिती.
:विविध वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमात निवेदक म्हणून सहभाग.
:‘कवी जेव्हा बोलतो’ या कविता वाचनाच्या कार्यक्रमात सहभाग व सादरीकरण.
:अनेक परिषदा, चर्चासत्र व कार्यशाळांमध्ये सहभाग व शोधनिबंध वाचन.

समन्वयक: आदिवासी साहित्य आणि लोककला, राष्ट्रीय परिषद.

भूषविलेली पदे: माजी विभागीय कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठ
:माजी कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसईरोड (प.), जि. पालघर
:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मराठी विषयासाठी समंत्रक
:माजी समन्वयक, आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग, मुंबई विद्यापीठ.

२. डॉ. सखाराम डाखोरे (सहाय्यक प्राध्यापक) (एम. ए., बी. एड्, नेट, पीएच्. डी. मराठी)
– १५ सप्टेंबर २००९ पासून अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात कार्यरत.
अनुभव – कनिष्ठ महाविद्यालय – जे. ई. एस. महाविद्यालय, जालना येथे कनिष्ठ महाविद्यालयात २ अर्धवेळ शिक्षक व २ वर्षे पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्य (२००५ ते २००९)
अनुभव – पदवी महाविद्यालय – सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालय, वसई रोड (प.) जि. पालघर (२००९ ते आजपर्यंत)
पी. एचडी. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
पी. एच डी साठी निवडलेला विषयः मराठी व हिंदीतील आदिवासी कवितेचा तौलनिक अभ्यास
कवितासंग्रह – रानवा, डिंपल पब्लिकेशन, वसई, मुंबई (२०१९
• विविध कविसंमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
• अनेक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांमध्ये निवेदक, सूत्रसंचालक म्हणून निमंत्रित.
• मुंबई आकाशवाणीच्या ‘साहित्य सौरभ’ ह्या कार्यक्रमात तीन वेळा काव्यसादरीकरण.
• ‘शिदोरी’ ह्या स्वरचित काव्यसादरीकरण कार्यक्रमाचे प्रा. सुहास सदावर्ते (निवेदक) यांच्यासमवेत महाराष्ट्रात एकूण ०८ प्रयोग सादर.
• ‘कवी जेव्हा बोलतो’ ह्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात डॉ. शत्रुघ्न फड, प्रा. उत्तम भगत व प्रा. प्रदीप पाटील यांच्यासमवेत एकूण ८० प्रयोग सादर.
•विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये निबंधवाचक म्हणून सहभाग
• वक्तृत्व, वादविवाद, काव्यस्पर्धांमध्ये परीक्षक व मार्गदर्शक.
• अनेक आदिवासी साहित्यमेळाव्यांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित.
• NSS च्या अनेक शिबीरांमध्ये व्याख्याने/काव्यवाचनासाठी निमंत्रित.
• अनेक महाविद्यलयांमध्ये व्याख्याता, मार्गदर्शक म्हणून निमंत्रित.
• जेईएस संस्था, जालनाच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘जेईएस प्रेरणा गीत’ लेखन.
• सध्या कार्यरत असलेल्या विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘विद्यावर्धिनी प्रेरणा गीत’ लेखन.
• विविध मासिके, दिवाळी अंक व संपादित पुस्तकांमध्ये लेख, कविता प्रसिद्ध.
• विविध मासिके व नियतकालिकांमध्ये आतापर्यंत २० शोधनिबंध प्रकाशित
• अध्यक्ष, ‘आदिम ज्ञानवृक्ष’ सामाजिक संस्था
• सदस्य, समाजभान त्रैमासिक
• सहसंपादक, आदिवासी साहित्य आणि लोककला (ग्रंथ)
• ५ ग्रंथांमध्ये आदिवासी समाज, साहित्य, संस्कृती व भाषाविषयक लेखन
• विविध युट्यूब चैनलवर ५ गाणी प्रसिद्ध.
• उलगुलान एक साहित्यिक चळवळ, फेसबुक पेज संचालक
– आतापर्यंत या फेसबुक पेजवर महाराष्ट्रातील विविध मान्यवरांची ११४ व्याख्याने घेतली आहेत

३. प्रा. शैलेशऔटी (सहाय्यक प्राध्यापक)
(एम. ए. एम फिल, सेट, नेट)२०११ अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालयात कार्यरत.
१९९९ पासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत
२२ वर्षांहून अधिक काळ पदवी महाविद्यालयात अध्यापन. संतसाहित्य, साहित्यशास्त्र आणि समीक्षा याविषयांत विशेष रस. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून एम. फिल. या पदवीसाठी ‘मिखाईल बाख्तीन यांचा संभाषितविचार : भाऊ पाध्ये यांच्या वासूनाका या कादंबरीसंदर्भात’ या विषयावर संशोधन प्रबंधिका सादर.
याशिवाय मराठी साहित्य आणि समीक्षा या विषयावर विविध चर्चासत्रामधे निबंध सादर. त्याचप्रमाणे संशोधनविषयक नियतकालिकांमधून संशोधनपर निबंधलेखन.
तसेच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळातर्फे आयोजित अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या अमराठी भाषकांसाठी मराठी प्रमाणपत्र आणि मराठी पदविका या अभ्यासक्रमांसाठी १९९९ पासून अध्यापन. तसेच १९९९ ते २००९ या कालावधीत मुंबई विद्यापीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या उपरोक्त प्रमाणपत्र आणि पदविका या अभ्यासक्रमासाठी समन्वयक म्हणून काम केले आहे.
२००३ पासून आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागात हंगामी वृत्तनिवेदक आणि वृत्तअनुवादक म्हणून १८वर्षांहून अधिक काळ कार्यरत.
पुस्तके आणि वाचनसंस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय.
गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या मराठी विभागात वाचनविषयक उपक्रम राबवत आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य विभागीय ग्रंथालय चालवत आहे.

Students

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो, या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणारे आदिवासी समाजातील विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात, विशेष करून मराठी विषय घेऊन बीएची पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वारली चित्रकला, आदिवासी नृत्य व आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध कलाप्रकारांमध्ये हे विद्यार्थी पारंगत आहेत.

मराठी विषयाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. बीएची पदवी संपादन केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी विद्यापीठीय शिक्षण घेतात. या विभागातील विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व वक्तृत्व, वाद-विवाद, निबंध लेखन, कविता लेखन, कथालेखन अशा विविध स्पर्धांच्या अनुषंगाने विकसित केले जाते.

Students Achivement
1. अमित सुरेश पाटील या विद्यार्थ्यांने संपूर्ण मराठी (सहा अभ्यासविषयपत्रिका) या विषयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ या वर्षात विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर सुवर्णपदक मिळविले आहे.
2. विभागाचे अनेक विद्यार्थ्यी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत तसेच काही विद्यार्थी पत्रकारीतेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

Departmental Activities

कथालेखन, कवितालेखन, निबंधलेखन, प्रवासवर्णनलेखन, स्पर्धापरीक्षा विषयक मार्गदर्शन अशा अनेक विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची कला जोपासण्याचे काम मराठी विभाग, मराठी वांग्मय मंडळा तर्फे सात त्याने केले जाते.

मराठी वांग्मय मंडळातर्फे प्रेरणा भित्तीपत्रक, काव्यानंद आविष्कार शब्दसुरांचा, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौरव दिन, कवी/साहित्यिक आपल्या भेटीला असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते व त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात, बोली अभ्यासक डॉ. गणेश देवी, चरित्रलेखिका वीणाताई गवाणकर, ग्रंथालीचे प्रमुख दिनकर गांगल, साहित्यिका अरुणा ढेरे, साहित्यिका सिसिलिया कार्व्हालो, साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, कादंबरीकार आनंद विंगकर, कवी प्रकाश घोडके, कवी इंद्रजित भालेराव, नाटककार दत्ता भगत, कवी वाहरू सोनवणे, साहित्यिक डॉ. विनायक तुमराम, कवयित्री उषाकिरण आत्राम, वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे अशा अनेक मान्यवरांनी मराठी विभाग, मराठी वांङ्मय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे.

या विभागात प्राध्यापक शैलेश औटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय ग्रंथालय चालविले जाते. या ग्रंथालयात २००० हून अधिक ग्रंथ आणि नियतकालिके तसेच काही सिडीज् उपलब्ध आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या ग्रंथांचा लाभ घेतात.

साहित्य कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वांङ्मयीन मूल्ये रुजविली जातात.

Facilities

या विभागासाठी २२ फुट लांबी व १७ फुट रूंदीचे सर्व सोयींनी युक्त दालन उपलब्ध आहे.

या विभागात कम्प्यूटर, प्रिंटर व जलद इंटरनेट वाय-फायची ची सुविधा आहे.

विभागाच्या दालनात विद्यार्थ्यांसाठी २५ विद्यार्थी क्षमतेची वर्गखोली उपलब्ध आहे. विभागाच्या नियमित तासिकांनंतर ही वर्गखोली अभ्यासिका तसेच वाचनकक्ष म्हणून उपयोगात आणली जाते.

मराठी विभागात मराठी भाषा तसेच साहित्य विषयक संदर्भग्रंथ तसेच वैचारिक आणि ललित साहित्याची पुस्तके उपलब्ध आहेत.